पालघरच्या हुतात्मा चौकात बुधवारी देशप्रेमी जनतेचा जनसागरच लोटला होता. 1942च्या ‘चले जाव’ आंदोलनात धारातीर्थी पडलेल्या पाच हुतात्म्यांना या वेळी अभिवादन करण्यात आले. विविध पक्षांचे राजकीय नेते, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या गर्दीने मध्यवर्ती भागात असलेला हा चौक चहूबाजूने अक्षरशः ओव्हरपॅक झाला होता.