पालघरवासीयांना उद्ध्वस्त करणाऱया वाढवण बंदराचे भूमिपूजन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघर येथे झाले. या भूमिपूजनासाठी येणाऱया पंतप्रधानांना वाढवणवासीयांनी कडाडून विरोध केला. सकाळपासूनच काळे झेंडे दाखवत आणि ‘मोदी गो बॅक’चे नारे देत मच्छीमारांनी ठिकठिकाणच्या किनारपट्टय़ा दणाणून सोडल्या. वाढवणवासीय गनिमी काव्याने मोदींच्या सभेत घुसून काळे झेंडे दाखवतील या भीतीने पोलिसांनी अक्षरशः दडपशाही केली. वाढवणवासीयांना गावातच काsंडून ठेवले. एकाही गावकऱयाला गावाबाहेर पडू दिले नाही. त्यामुळे संतप्त वाढवणवासीयांनी ‘सरकार गेलं हो।़।़’ अशा घोषणा देत हुपूमशाही सरकारची गावात अंत्ययात्रा काढली.
वाढवण बंदरामुळे स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्र अक्षरशः देशोधडीला लागणार आहेत. त्यांच्या रोजीरोटीवर वरवंटा फिरवून त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागणार आहे. समुद्रातील प्रवाळ आणि मत्स्यबीज व प्रजनन केंद्रे उद्ध्वस्त होणार आहेत. त्याचबरोबर तारापूरमधील अणुशक्ती केंद्राच्या इमर्जन्सी प्लॅनिंग झोनमध्ये वाढवण बंदर येत असल्याने या अणुशक्ती केंद्रालाही मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे वाढवण बंदराला वाढवणसह संपूर्ण पालघर जिह्याने कडाडून विरोध केला असतानाही केंद्र सरकारने दडपशाही करून आज या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले.
बंदर वाढवणला उभारण्याचा घाट सरकारने घातला असला तरी प्रत्यक्ष भूमिपूजन मात्र 30 किलोमीटर लांब असलेल्या पालघरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात भूमिपुत्र आणि मच्छीमारांनी कोणताही गोंधळ घालू नये म्हणून आज सकाळपासूनच डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातही ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
View this post on Instagram
वरोर नाक्यावर संघर्ष समितीचे पदाधिकारी नारायण पाटील, डहाणूचे आमदार विनोद निकोले, आमदार विनोद भुसारा, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, मिलिंद राऊत, जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी, डहाणू पंचायत समितीचे उपसभापती पिंटू गहला, डॉ. सुनील पराड, माजी आमदार कपिल पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा, अॅड. विराज गडग यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने एकत्र जमले. पोलिसांनी नाकाबंदी करून मार्ग रोखल्याने संतप्त गावकऱयांनी वाढवण नाका, वरोर नाका येथे एकत्र येत केंद्र सरकार आणि जेएनपीटीची तिरडी यात्रा काढली. रामनाम सत्य है, मोदी सरकार मुर्दाबाद, जेएनपीटी मुर्दाबाद अशा घोषणा देत त्यांनी पंचक्रोशी दणाणून सोडली.
उत्तनमध्येही आंदोलन
केंद्राने दडपशाहीने वाढवण बंदर लादले. त्याचा निषेध उत्तनमधील मच्छीमारांनीही केला. महाराष्ट्र मच्छीमार पृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो, उत्तन मच्छीमार सोसायटीचे विल्डन बांडय़ा, उपाध्यक्ष फ्रेडीक भंडारी, चौक सोसायटीचे माजी अध्यक्ष जॉर्ज गोविंद, अजित गंडोली, उत्तन मच्छीमार सोसायटीचे सचिव बोना मालू यांच्यासह मच्छीमारांनी मोदींविरोधात काळे झेंडे फडकवत आणि सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन केले. पोलिसांनी त्यांची धरपकड करून त्यांना एक तास डांबून ठेवले.
बोटींवर काळे फुगे, काळे झेंडे
सरकारच्या दडपशाहीविरोधात डहाणू खाडी येथे सकाळीच सुमारे साडेतीनशे मच्छीमारांनी बोटींवर काळे फुगे आणि काळे झेंडे लावून समुद्रातच मार्च काढला.
शिवसेना जिल्हाप्रमुखही नजरकैदेत
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख अजय ठाकूर, अनुप ठाकूर या दोघांनाही ताब्यात घेऊन पालघर पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनाही वाडय़ात स्थानबद्ध करण्यात आले.
सरकार हम से डरती है… पुलिस को आगे करती है!
वाढवण गावाला पोलीस छावणीचेच रूप आले होते. गावकऱयांना बाहेर जाऊ दिले जात नव्हते. त्यामुळे त्यांच्या संतापाचा स्पह्ट झाला. नही चलेगी नही चलेगी.. तानाशाही नही चलेगी, हमारे गाव में हमारा राज, आम्ही आहोत आत्मनिर्भर… आम्हाला नको वाढवण बंदर, सरकार हम से डरती है… पुलिस को आगे करती है… अशा घोषणांचे फलक हाती घेत वाढवणवासीयांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले.