पालघरमधील शिवसैनिकाने प्रशासनाला दिले 5 टन धान्य

2184

शिवसेनेचे पालघर विधानसभा प्रमुख वैभव संखे यांनी सामाजिक बांधिलकी जपत 5 टन धान्य प्रशासनाकडे सुपूर्द केले. या धान्याची किंमत 3 लाख 50 हजार असून स्थलांतरिताना या धान्यामार्फत केंद्रीय स्वयंपाक गृहातून अन्न शिजवून देता येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार बोईसरच्या करमतरा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत शिवसेनेचे पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे व कंपनीचे प्रशासन प्रमुख नायर यांनी जिल्हा प्रशासनाला पाच टन धान्याची मदत देऊ केली. हे धान्य आज जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी उपजिल्हाधिकारी किरण महजन, तहसीलदार उज्वला भगत उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत मदत केल्याने जिल्हा प्रशासनाने वैभव संखे यांचे आभार मानले तसेच सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या