जे.जे.रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.पल्लवी सापळे

417

जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची पुण्यातील ससून रुग्णालयात तसेच बी.जे. मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी बदली करण्यात आली आहे. डॉ. चंदनवाले यांनी डिसेंबर 2018 मध्ये मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला होता.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत जे. जे. रुग्णालयात आमूलाग्र बदल केले, रुग्णहिताचे अनेक निर्णय घेतले. रुग्णांच्या मदतीसाठी सामाजिक दायित्व निधी उपक्रम सुरू केला. डॉ. अजय चंदनवाले यांच्यानंतर डॉ. पल्लवी सापळे या जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा भार स्वीकारतील. त्या सांगलीतील मिरज सरकारी वैद्यकीय विद्यापीठाच्या अधिष्ठाता होत्या. सांगलीत पुराने हाहाकार माजवल्यानंतर डॉ. पल्लवी सापळे यांनी मोठे मदतकार्य केले होते. पूरग्रस्तांना तातडीने उपचार उपलब्ध करून दिले. पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिरे राबवली.

आपली प्रतिक्रिया द्या