शालेय मुलांच्या बसला मोठा अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. 15 विद्यार्थी जखमी असल्याची प्रथामिक माहिती आहे.
हरयाणातील पंचकुलामध्ये मोरनी हिल्सला भेट देणाण्यासाठी जात असलेल्या शाळकरी मुलांच्या बसला मोरनीजवळ टिक्कर ताल येथे थळ गावाजवळ अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने बस भरधाव वेगात चालवल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच स्थानिक प्रशासनाने जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.
बस अपघातात सुमारे 10 ते 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. उपचारासाठी मोरनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही मुलांना पंचकुलाच्या सेक्टर 6 सिव्हिल हॉस्पिटलमध्येही उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.