पंढरपूर – तहसीलदारांना कोरोना झाल्याची फेक पोस्ट टाकल्याने गुन्हा दाखल

523

तहसीलदारांना कोरोनाची लागण झाली अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकून बदनामी केल्या प्रकरणी पंढरपूरच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी पोस्ट टाकणारे सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून पंढरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांचे बाबत 15 जुलै 2020 रोजी पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण यांनी कसलाही अधिकार नसताना कसलीही खातरजमा न करता तहसीलदारांना कोरोनाची लागण अशी फेसबुकला पोस्ट टाकून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला होता. या मजकुराची दखल घेऊन तहसीलदार वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सागर चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सागर चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गाडेकर पुढील तपास करीत आहेत. महिला तहसीलदारांनी फेसबुक वरील पोस्टची गंभीर दखल घेऊन कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या