कार्तिकी यात्रेसाठी ‘लालपरी’ सज्ज; 1150 एसटी भाविकांच्या सेवेत

पुढील महिन्याच्या सुरुवातीला, 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त मोठय़ा प्रमाणावर भाविक श्री क्षेत्र पंढरपूरला जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून राज्यभरातून एसटीच्या जादा 1150 बसगाडय़ा भाविकांच्या सेवेत धावणार आहेत. त्यामुळे भाविकांचा श्री क्षेत्र पंढरपूरचा प्रवास सुकर होणार आहे. पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या ‘चंद्रभागा’ या यात्रा बसस्थानकावरून 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे. तेथील बसस्थानकावर 17 फलाट असून सुमारे 1000 बसेस लावण्याची सुसज्ज पार्ंकग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय बसस्थानकामध्ये केली आहे.