
मकरसंक्रांती निमीत्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यास तसेच संपुर्ण मंदिरास पतंग, फळभाज्या व फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. या अनोख्या सजावटीमुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास मनमोहक स्वरूप प्राप्त झाले.
राहुल ताम्हाणे, राजु नाईक, सचिन या भाविकांनी ही पूजा अर्पण केली आहे. अरास करण्यासाठी साधारणतः 1.5 टन फळभाज्या व फुले वापरण्यात आली होती. भाज्यांमध्ये गवार, भेंडी, फ्लॉवर, मुळा, गाजर, वांगी कोबी, बीट, दोडका अशा 60 प्रकारच्या फळभाज्या वापरण्यात आलेल्या. तसेच तसेच तिळगुळ व पतंग यांच्यासोबत झेंडू, शेवंती या फुलांची
रंगसंगती वापरून आरास करण्यात आली. पुण्यातील ताम्हाणे फ्लॉवर्स डेकोरेटर्स व पंढरपूरच्या साई फ्लॉवर डेकोरेटर्स व शिंदे ब्रदर्स यांनी ही सजावट केली आहे.


























































