पंढरपुरात १० लाख भाविक दाखल; दर्शनासाठी २२ तास

27

सामना प्रतिनिधी ।  पंढरपूर

कपाळी चंदनाचा टिळा, बुक्का व अष्टगंध़ गळा तुळशी माऴ डोळ्य़ावर तुळशी वृदांवऩ भगव्या पताक़ा चेहऱयावर विठ्ठलाच्या भेटीची आस. आसमंतभर घुमणारा टाळ-मृदंग, विण्यांचा नाद. अन् ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय…’ असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यासह शेकडो पालख्या अन् दिंडय़ा रविवारी पंढरीत दाखल झाल्या.

वैष्णवांचा महासागर पंढरीत आल्याने तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त भाविक असल्याचा अंदाज आहे. पंढरपूरजवळील वाखरी मुक्कामी असलेले पालखी सोहळे रविवारी दुपारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. इसबावी, केबीपी कॉलेज, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँकमार्गे पालखी सोहळे आपापल्या मठात जाऊन विसावले. टाळ-मृदंगांच्या गजराने पंढरीचा पालखी मार्ग दुमदुमून गेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या