
सामना प्रतिनिधी । सातारा
फलटण तालुक्यातील जाधवनगर (उपळवे) येथील महात्मा पुâले सामाजिक सेवा प्रतिष्ठानने ५१ भाविकांना केवळ १ रुपयामध्ये पंढरपूरची यात्रा घडविली आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. या अभिनव उपक्रमामुळे पांडुरंगापुढे नतमस्तक झाल्याने वारकरी संप्रदायातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.
महात्मा पुâले सेवा प्रतिष्ठानचे सल्लागार व प्राथमिक शिक्षक वसंतराव रासकर यांच्या प्रेरणेतून आणि उपाध्यक्ष अशोकराव जाधव, सचिव महेश जाधव यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते. पंढरपूरच्या या वारीत पुरुष, महिला व मुलांचाही समावेश होता. पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेऊन या सर्व भाविकांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. या कार्यात सरपंच सतीश जाधव, रमेश जाधव, अमोल जाधव ग्रामपंचायत व तरुण मंडळाच्या सदस्यांनी बहुमोल सहकार्य केले. अशा उपक्रमाद्वारे गावात सामाजिक एकोपा वृद्धिंगत होऊन गावाच्या विकासासाठी मदत होत असल्याचे अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.































































