स्वरभास्कराला मानवंदना! 25 एप्रिलपासून प्रभादेवीत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या अजरामर स्मृतीस अर्पण भव्य शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  हा तीन दिवसीय महोत्सव 25 ते 27 एप्रिल दरम्यान रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे सायंकाळी 6 वाजता होईल.

शास्त्राrय संगीत महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून त्याच्या प्रवेशिका रवींद्र नाटय़मंदिर, श्री छत्रपती शिवाजी नाटय़मंदिर, दादर व माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 यावेळेत उपलब्ध होतील. हा महोत्सव म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांच्या दिव्य स्वर आणि अखंड साधनेला अर्पण केलेली एक सुरम्य श्रद्धांजली आहे.

महोत्सवात काय

n 25 एप्रिल ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे आणि   उस्ताद शाहीद परवेज खान.

n 26 एप्रिल विदुषी मंजुषा पाटील, स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली.

n 27 एप्रिल पंडित आनंद भाटे, पंडित उल्हास कशाळकर.