#SacredGamesS2 पंकज त्रिपाठीला ‘गुरुजी’ची भूमिका कशी मिळाली? व्हिडीओ व्हायरल

634

बहुचर्चित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे. पहिला भाग आवडल्यानंतर प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने दुसऱ्या भागाची वाट पाहात होते. या भागात अनेक नव्या भूमिका पाहायला मिळाल्या. कल्की कोचलिन हिने ‘बत्या’ आणि पंकज त्रिपाठी यांनी ‘गुरुजी’ची भूमिका केली. दुसऱ्या भागात गुरुजींची भूमिका महत्त्वाची आहे. ही भूमिका पंकज त्रिपाठीला कशी मिळाली याचा खुलासा नेटफ्लिक्सने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून केला आहे.

यूट्यूबवर नेटफ्लिक्सचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सेक्रेड गेम्ससाठीच्या ऑडिशनचा हा व्हिडीओ आहे. यात पंकज त्रिपाठी प्रथम नवाजुद्दीनने साकारलेल्या गणेश गायतोंडेच्या भूमिकेसाठी काही संवाद बोलताना दिसतो. त्यानंतर बंटीचे संवाद बोलताना दिसतो. परंतु यात अश्लिल शब्द असल्याने ही भूमिका करण्यास तो नकार देतो. यानंतर गुरुजींच्या संवादाची स्क्रिप्ट त्याला देण्यात येते आणि त्यानंतर या भूमिकेसाठी होकार देतो. असा हा व्हिडीओ आहे.

“लीक्ड ऑडिशन टेप्स” या नावाने हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या