पंकज उधास यांची गणेशभक्तांना भेट

59

सामना ऑनलाईन । मुंबई

गझल गायक पंकज उधास यांचे पहिलेच गणपतीवरील नवीन गाणे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरावर आधारित असून ‘जय गणेश’ असे गाण्याचे बोल आहेत. भक्तिगीताचे प्रकाशन नुकतेच प्रभादेवी येथील सिद्धिकिनायक मंदिरात देवाच्या चरणी सीडी अर्पण करून करण्यात आले. सीडीतील हे भक्तिगीत  पंकज उधास यांनी श्री सिद्धिविनायक गणपतीला अर्पण केले आणि या सीडीचे प्रकाशन झाल्याचे जाहीर करण्यात आले. मी सिद्धिविनायकाचा भक्त आहे. सिद्धिविनायकाच्या चरणी एक गाणे अर्पण करायचे होते आणि गेली कित्येक कर्षे ते मनात घोळत होते. आता या गाण्याच्या रूपाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. विशाल धुमाळ यांनी अत्यंत सुंदररीत्या संगीत रचना केली असून गाण्याचे अर्थपूर्ण व भक्तिपूर्ण बोल आलोक श्रीवास्तक यांनी लिहिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या