12 डिसेंबरला काय बोलणार पंकजा मुंडे

3362

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. हा पराभव त्यांनी स्वतः स्विकारला. त्यानंतर पक्षातील प्रत्येक कामात त्या सक्रिय होत्या. पक्षाच्या प्रत्येक बैठकीस त्या हजर होत्या. आता 12 डिसेंबर रोजी त्या जनतेशी संवाद साधणार आहेत. फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहून त्यांनी ही माहिती दिली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे. 12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त.”

या दिवशी सर्वांनी गोपीनाथगडावर येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या