माजी मंत्री, तीन वेळचे आमदार बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिष्णोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून अन्य काही आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे. मात्र वाय सुरक्षा असलेल्या नेत्याच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे. अशाच बिहारचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी बिष्णोई गँगला थेट आव्हान दिले आहे.
बाबा सिद्दिकी याच्या हत्येनंतर बिष्णोई गँगने एक पोस्ट केली होती. सलमान खानशी जवळीक आणि दाऊद इब्राहिमशी संबंध यामुळे ही हत्या करण्यात आल्याचे बिष्णोई गँगने म्हटले होते. विशेष म्हणजे बिष्णोई गँगने गेल्या काही काळात तीन बड्या लोकांची हत्या केली आहे. यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला, करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग यांचा समावेश आहे. याच गँगला आता पप्पू यादव यांनी धमकावले असून 24 तासात नेटवर्क संपवू असा इशारा दिला आहे.
पप्पू यादव यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. यात त्यांनी काही असंसदीय शब्दांचाही वापर केला आहे. एक आरोपी तुरुंगामध्ये बसून लोकांची हत्या करतो आणि सर्वजण शांत बसून पाहताहेत. कधी मुसेवाला, तर कधी करणी सेनेचे प्रमुख आणि आता एक उद्योगपती व राजकारणी नेत्याची हत्या करण्यात आली. कायद्याने परवानगी दिली तर 24 तासांमध्ये लॉरेन्स बिष्णोई सारख्या गँगस्टरचे नेटवर्क संपवून टाकेन, अशा इशारा पप्पू यादव यांनी दिला.
यह देश है या हिजड़ों की फौज
एक अपराधी जेल में बैठ चुनौती दे
लोगों को मार रहा है,सब मुकदर्शक बने हैंकभी मूसेवाला,कभी करणी सेना के मुखिया
अब एक उद्योगपति राजनेता को मरवा डालाकानून अनुमति दे तो 24घंटे में इस लारेंस बिश्नोई
जैसे दो टके के अपराधी के पूरे नेटवर्क को
खत्म कर दूंगा— Pappu Yadav (@pappuyadavjapl) October 13, 2024
तिघांना अटक
बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने रविवारी गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप या दोघांसह रात्री पुण्यातून प्रवीण लोणकरला अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तुले, 28 जिवंत काडतुसे आणि सहा रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. तसेच शिवकुमार गौतम आणि मोहम्मद जिशान अख्तर या अन्य दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे. अख्तर हा पटियाला तुरुंगात असताना बिष्णोई टोळीशी संपर्कात आला होता. गुरमेल व धर्मराज या दोघांना न्यायालयाने 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लॉरेन्स बिष्णोई टोळीने केली बाबा सिद्दिकी यांची हत्या, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुडदा