पापरी चक्रवर्ती यांना ‘गानसरस्वती’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने दिला जाणारा गानसरस्वती पुरस्कार पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी पापरी चक्रवर्ती यांना  जाहीर झाला आहे. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मरणार्थ 2019 सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. किशोरी आमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार सुरू केला आहे.  येत्या 8 मार्च  रोजी पुरस्कार समारंभ संस्थेच्या सभागृहात सायंकाळी 5 वाजता होईल. त्यानंतर पापरी चक्रवर्ती यांचे गायन होईल.