शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी पालम ते मुंबई 600 कि.मी.चा सायकल प्रवास

शिवसैनिकांचा श्वास असणारे शिवसेनाप्रमुखांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना शिवतिर्थावर आदरांजली वाहण्यासाठी पिंपळगाव तालुका पालम येथील निष्ठावंत शिवसैनिक 600 कि.मी.चा प्रवास सायकलवर पार करत आहेत. त्यांचे हे सहावे वर्ष असून ठिकठिकाणी या शिवसैनिकाचा हृदय सत्कार केला जात आहे.

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव येथील रामचंद्र शामराव गायकवाड कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखला जातो. शिवसेनाप्रमुख आपले सर्वस्व होते. त्यांच्या विचाराने भारावून कायम शिवसेनेशी निष्ठा बाळगणारा हा तरूण शिवसेनाप्रमुखांच्या जयंती दिनानिमित्त शिवतिर्थावर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पिंपळगाव ते मुंबई असा 600 कि.मी.चा प्रवास सायकलवर पार करतो. गेल्या सहा वर्षापासून हा शिवसैनिक दरवर्षी कामाचा कितीही व्याप असला तरी आपल्या आवडत्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी पंधरा दिवस बाजुला काढतो. पिंपळगावमधून निघालेला हा शिवसैनिक दरकोस दर मुक्काम करत मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे. रस्त्यात मिळेल ते पोटाला खायचे आणि पुढे चलायचे असा त्यांचा नित्यक्रम, शिरूरमध्ये या कट्टर शिवसैनिकाचे आगमन होताच स्थानिक शिवसैनिकांनी त्यांचा हृदय सत्कार करत शुभेच्छा दिल्या. गावोगाव स्थानिक शिवसैनिक त्यांचे असे स्वागत करत असतात. शिरूरहून ते आज सकाळी ते मुंंबईच्या दिशेने रवाना झाले. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिना दिवशी शिवतिर्थावर आदरांजली वाहून नतमस्तक होत पुन्हा सावकलवरच परतीचा प्रवास त्यांचा चालू असतो.

आपली प्रतिक्रिया द्या