परभणी जिल्ह्यात आज दिवसभरात 81 बाधितांची भर

333

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी शहरासह जिल्ह्यात एकूण 81 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. परभणी शहरात 37 कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 996 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून 440 रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तसेच 49 बाधित मृत्यूमुखी पडले असून रुग्णालयातील संक्रमीत कक्षात 508 रुग्ण उपचार घेत आहेत.

आतापर्यंत एकूण 5 हजार 649 संशयित रुग्ण दाखल झाले असून संसर्गजन्य कक्षात 508, विलगीकरण केलेले 964 व विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 4 हजार 177 एवढे रुग्ण आहेत. एकूण 5 हजार 925 संशयितांचे स्वॅब घेतल्या गेले असून त्यातील 4 हजार 701 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर 996 स्वॅब पॉझीटीव्ह आले आहेत. 136 स्वॅब अनिर्णायक असून 52 स्वॅब तपासणीस आयोग्य ठरले आहेत. 40 स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या