परभणी – वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार

परभणी येथील महावितरण कंपनीच्या वीज कर्मचार्‍यांनी मोठ्या मेहनतीने स्थापन केलेल्या वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेत पतसंस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी संचालकांच्या संगनमताने लक्षावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला असून तसा अहवाल लेखापरीक्षणात आलेला आहे. शिवाय त्या अहवालानुसार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सेलू यांनी केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. संबंधितावर सहकार कायद्यातील कलम ८८ अन्वये कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांनी सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सेलू येथील महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी आपल्या वेतनातून काही व डिपॉझिट जमा करून वीज वितरण सहकारी पतसंस्था उभी केलेली आहे. गेल्या काही वर्षापासून या संस्थेवर सध्या कार्यरत असलेल्या् कार्यकारिणीतील संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी संचालक मंडळाच्या संगनमताने लक्षावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरील बाबही संस्थेने केलेल्या लेखापरीक्षणातून उघड झालेली आहे. संस्थेने 2018-19 या वर्षाचा लेखा परीक्षणाचा अहवाल शासकीय लेखापरीक्षकांनी केलेला आहे. या लेखापरीक्षणात काही गंभीर बाबी आढळल्या असल्यामुळेयाबाबतचे विशेष नोंद केलेले विशेष अहवाल सहाय्यक निबंधक सेलू जिल्हा परभणी यांना दिला त्यानुसार या अहवालात सहकार कायद्यातील कलम ८३ अन्वये सहाय्यक निबंधक यांनी सहकार अधिकारी पी.बी. राठोड यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करून चौकशी करण्याचे आदेश दिले.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सेलू यांनी दिलेल्या आदेशान्वये राठोड यांनी कलम ८३ अन्वये चौकशी करून अहवाल दाखल केलेला आहे. या अहवालात नमूद केलेल्या बाबी नुसार संस्थे करिता खरेदी केलेल्या प्लॉट मध्ये जवळपास १५ लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार केलेला असून शासकीय मूल्यांकनापेक्षा १५ लाख रुपयांनी जास्त किमतीने खरेदी केल्याचे नमूद केलेले आहे. तर या व्यतिरिक्त जवळपास दीड लाख रुपये अनावश्यक खर्च केल्याचे दिसून येत आहे,

आपली प्रतिक्रिया द्या