तेलंगणा येथील आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त बुध्दीबळ स्पर्धेत परी चव्हाण हिचे सुयश 

604

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

तेलंगणा येथे सिकंदराबाद मध्ये ८ ते १० डिसेंबर दरम्यान आर्य मंगलम हॉलमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त बुध्दीबळ स्पर्धेत न्युझीलंड, रशियासह विविध देशातील व भारतातील २६ राज्यातील २०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त बुध्दीबळ खेळाडूसह स्पर्धेत जवळपास एकुण ३०० खेळाडूंने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून चव्हाण चेस अ‍ॅकेडमीचे प्रसिध्द राष्ट्रीय बुध्दीबळ खेळाडू परी चव्हाण, सोहम चव्हाण, शंतनु हाडे, रुतुजा रहाटे, विनायक बळी या खेळाडूनी भाग घेतला होता. या स्पर्धेत परी चव्हाणने दुसर्‍यांदा या आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त स्पर्धेत खेळताना आपल्या आक्रमक खेळाचा परिचय करुन देत विविध खेळाडूना पराभुत करुन स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

सात वर्षाखालील वयोगटात तिने ऊत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करित चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळविले. लवकरच विदर्भातील सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळविणारी पहिली खेळाडू होण्याचे भाग्य तिला मिळणार आहे. ही बुलढाणा जिल्हासाठी मोठी उपलब्धी होणार आहे. सोहम चव्हाणने सुध्दा या स्पर्धेत ऊत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करित नऊ वर्ष वयोगटात पाचवा क्रमांक मिळविला. शंतनु हाडेने सुध्दा ऊत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करित तेरा वर्ष वयोगटात आंतरराष्ट्रीय रेटिंग खेळाडूला पराभुत केले.

पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेणार्‍या विनायक बळीने न्युझीलंडच्या खेळाडूवर एकतर्फी विजय मिळवुन ऊत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महिला वयोगटात सुध्दा रुतुजा रहाटेने या ऊत्कृष्ट बुध्दीबळ खेळाडूने कडवी झुंज देत दमदार खेळाचे प्रदर्शन केले. महिला वयोगटात तिने पाचवे स्थान प्राप्त केले.  या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असुन चव्हाण चेस अ‍ॅकेडमीतर्फे त्यांना सन्मानीत करण्यात आले. आपल्या यशाचे श्रेय ते बुध्दिबळ मार्गदर्शक सुरेश चव्हाण, चव्हाण चेस अ‍ॅकेडमीच्या संचालिका प्रिया चव्हाण यांना देतात.

आपली प्रतिक्रिया द्या