मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मनू भाकरने आपला हाच दमदार खेळ कायम ठेवत तिसऱ्या ऑलिम्पिक पदाकच्या दिशेने वाटचाल केली आहे. आज (02 जुलै) झालेल्या 25 मीटर पिस्तुल इव्हेंटच्या पात्रता फेरीत उल्लेखनीय कामगिरी करत मनू भाकरने फायलनमध्ये आपली जागा पक्की केली आहे.
मनू भाकरने 25 मीटर पिस्तुल प्रकारातील पात्रता फेरीमध्ये 590 गुणांची कमाई करत फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. तर दुसरिकडे इंडियाची नेमबाज ईशा सिंह 18 व्या स्थानावर राहिल्यामुळे तिला फायनलमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. जर मनू भाकरने जर 25 मीटर पिस्तुल प्रकारात पदक जिंकले, तर मनु भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन पदके जिंकणारी हिंदुस्थानची पहिली खेळाडू ठरेल. यापूर्वी सुशील कुमार आणि पी. व्ही. सिंधू यांनी एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. त्यामुळे मनू भाकरने उद्या (03 जुलै) 25 मीटर पिस्तुल प्रकारात तिसरे पदक जिंकले, तर एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन पदके जिंकणारी मनू भाकर हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिली खेळाडू ठरणार आहे.