Paris Olympics 2024 – नीरज चोप्राने रौप्यपदकावर कोरले नाव

पात्रता फेरीमध्ये ‘ब’ गटातून पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राने 89.34 मीटर भालाफेक करीत थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. तोच दरारा आणि तोच जोश कायम ठेवत नीरज चोप्राने फायनलमध्ये 89.45 मीटरचा बेस्ट थ्रो करत रौप्यपदक पटकावले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं 92.97 मीटरचा थ्रो करत सुवर्णपदकावर नाव कोरले.