हिंदुस्थानचा स्टार कुस्तीपटू अमन सहरावतने 57 किलो वजनी गटात सेमीफानलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायलनमध्ये झालेल्या सामन्यात अमन सहरावतने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत अल्बेनियाच्या झेलिमखान अबकारोव याचा 12-0 असा पराभव केला. अमन सहरावत आता पदकापासून फक्त एक पाऊल लांब आहे. अमनचा सेमीफायनल सामना Rio Olympics 2016 मध्ये रौप्य पदक विजेत्या जपानच्या हिगुचीविरुद्ध होणार आहे. हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी सेमीफायनलचा थरार सुरू होईल.