Paris Paralympics 2024 – नितेश कुमारने रचला इतिहास, हिंदुस्थानला मिळाले दुसरे सुवर्ण

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू नितेश कुमारने पुरुष एकेरीत SL3 प्रकारात ग्रेट ब्रिटनच्या डेनियल बेथेलचा पराभव करत सुवर्ण पदाक पटकावले. त्याचबरोबर नितेश कुमार पॅरिस पॅरालिम्पिकम 2024 मध्ये हिंदुस्थानसाठी सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.

नितेश कुमारने फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनच्या डेनियल बेथेल याचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला. विशेष म्हणजे नितेश कुमारने पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला असून त्याने पहिल्याच प्रयत्नात सुवर्ण पदकावर निशाणा साधला आहे. नितेश कुमार पुरुष एकेरीत पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणार तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी पुरुष एकेरित सुवर्ण पदके जिंकले आहेत. नितेश कुमारच्या सुवर्णपदकामुळे हिंदुस्थानची पदक संख्या नऊ वर पोहोचली आहे.