
संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. लोकसभा सचिवालयाने त्यासंदर्भात आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परवानगीने अधिसूचना जारी केली. 1 ऑक्टोबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
14 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्यसभेची बैठकही त्याच दिवशी अन्य वेळी बोलवली जाणार आहे. 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत संसदेचे अधिवेशन बोलवण्यात यावे अशी शिफारस मंत्रिमंडळ समितीने केली होती. कोणत्याही सुटीशिवाय हे अधिवेशन सलग चालणार आहे.
अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी आता खासदारांचीही कोरोना टेस्ट होणार आहे.
सभागृहात खासदारांना मास्क घालून बसावे लागणार असून भाषणदेखील मास्क घालूनच करावे लागेल.


























































