Video – 80 फूट उंच तारेत अडकलेल्या पोपटाला मिळालं जीवनदान

441

रहाटणी येथील लक्ष्मी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे 80 फूट उंचीवर तारेमध्ये एक जिवंत पोपट अडकल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. पिंपरी अग्निशमन दलाच्या जवानांनी ‘ब्रोन्टो स्काय लिफ्ट’ या विशेष वाहनांच्या मदतीने उंचीवर अडकलेल्या पोपटाची सुखरूप सुटका केली.

अग्निशमन दलाचे प्रमुख किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजता रहाटणी येथील लक्ष्मी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे 80 फूट उंचीच्या तारेमध्ये एक पोपट अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. पिंपरी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोपट 80 फूट उंचीच्या तारेत अडकला असल्यामुळे तेवढ्या उंचीवर जाण्यासाठी ‘ब्रोन्टो स्काय लिफ्ट’ या विशेष वाहनांचा वापर करण्यात आला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ‘ब्रोन्टो स्काय लिफ्ट’च्या मदतीने पोपटाला सुखरूप खाली घेतले व पाणी पाजून आकाशात सोडून दिले. पोपटाने सुटकेचा निःश्वास सोडत आकाशात उंच झेप घेतली. या बचाव कार्यासाठी पिंपरी अग्निशमन दलाचे जवान मयुर कुंभार आणि अमोल चिपळूणकर यांनी मेहनत घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या