सावरगावमध्ये दसरा मेळाव्याच्या तयारीला सुरुवात

22

सामना ऑनलाईन । बीड 

भगवान गडावरील दसरा मेळाव्याला गेल्यावर्षी परवानगी नकारण्यात आली होती. त्यामुळे पंकजा मुंडे आणि भक्तांनी राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगावमध्ये मेळावा घेण्याचे जाहिर केले होते. यंदा सावरगावमध्ये होणाऱ्या दसरा मेळव्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरु केली आहे. या वर्षी राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे भव्य स्मारक साकरले जात आहे. गेल्या वर्षी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांचे स्मारक उभारण्याचे जाहीर केले होते. या मेळाव्याची तयारी जोरदार सुरु आहे. या तयारीकडे पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांचे लक्ष आहे. दसरा मेळाव्यात भक्तांची गैरसोय होऊ नये, याकडे लक्ष देण्यात येत आहे. मेळाव्याच्या तयारीच्या पाहाणीसाठी अनेक नेत्यांनी सावरगावला भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या