हिंदुस्थानातून ‘कैलासा’वर येणाऱ्या प्रवाशांना बंदी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हिंदुस्थानातून येणाऱ्या भक्तांना ‘कैलासा’वर येण्याची बंद असल्याचा आदेश स्वामी नित्यानंद याने दिला आहे. तसेच फक्त हिंदुस्थानासह ब्राझिल, मलेशिया आणि युरोपिय संघ आणि मलेशिया येथील यात्रेकरूंनाही त्याने कैलासावर येण्यास बंदी घातली आहे.

हा निर्णय कैलासाच्या सेवेत असलेल्या जगातील सर्व राजदूतांसाठी असल्याचंही त्याने म्हटलं आहे. कैलासातील सर्व स्वयंसेवक, कर्मचारी आणि संबंधित सर्वजणांना क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. याकरिता कैलासावरील सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. म्हणून प्रतिबंध करण्यात आल्याचे, स्वामी नित्यानंद याने ट्विटरद्वारे म्हटले आहे.

लैंगिक शोषण आरोपाखाली स्वामी नित्यानंद 2019 साली फरार होऊन इक्वेडोरच्या एका बेटावर गेला होता. ऑगस्ट 2020मध्ये त्याने स्वत:च्या मालकीची रिझर्व्ह बँकेची स्थापना करून कैलाशियन डॉलर चलनाचीही घोषणा केली होती. स्वामी नित्यानंद हा ‘कैलासा’ला एक स्वतंत्र देश मानतो. तसेच हिंदू धर्माच्या संरक्षण आणि प्रसारासाठी कैलासाची स्थापना करण्यात आल्याचे नित्यानंद सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या