वंदे भारत ट्रेनच्या जेवणात आढळल्या अळ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हायटेक ट्रेन अशी ओळख बनलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला दिलेल्या जेवणात अळ्या आढळल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. एका प्रवाशाला देण्यात आलेल्या दह्याच्या कपात आणि जेवणात अळ्या वळवळत असलेले दिसत आहे. हा प्रकार समोर येताच प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्याकडे यासंबंधीची तक्रार केली, परंतु रेल्वे कर्मचाऱयाने प्रवाशाला समाधानकारक उत्तर न दिल्याने प्रवाशांचा संताप आणखी वाढला. पैसे देऊनही आम्ही निकृष्ट जेवण का खायचे असा, संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे. वंदे भारत ही अत्याधुनिक सेवेसाठी ओळखली जात असले तरी याआधीही जेवणात झुरळ आढळले होते.