वाराणसी ते व्यासनगरमध्ये आठ तास थांबली श्रमिक ट्रेन, मजूरांचा ट्रॅकवर उतरून गोंधळ

महाराष्ट्रातील पनवेलहून जौनपूरसाठी रवाना झालेल्या श्रमिक ट्रेनमधील मजूरांना रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला. सुरुवातीला ट्रेन जौनपूरच्या ऐवजी वाराणसीकडे वळवली त्यामुळे प्रवासी गोंधळले होते. त्यानंतर वाराणसी ते व्यासनगर स्थानकांच्या दरम्यान ही ट्रेन तब्बल आठ तास थांबली. भयंकर गरमी, स्वत:जवळचं पाणी संपलेलं असतानाच ट्रेन रखडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यांमुळे प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून गोंधळ घातला. तसेच दुसऱ्या ट्रॅकवरून जाणाऱ्या ट्रेनला देखील थांबविण्याचा प्रयत्न केला.

सदर ट्रेन पनवेलहून जौनपूरसाठी रवाना झाली होती. मात्र जौनपूरला पोहोचायच्या काही तास आधी ही ट्रेन वाराणसीच्या दिशेने वळविण्यात आल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. त्यानंतर वाराणसी स्थानकावर ट्रेन आठ तास थांबली. त्यानंतर ट्रेन सुरू झाल्यानंतर व्यास नगर स्थानकाच्या आधी ट्रेन दोन तास थांबली. त्यामुळे प्रवासी चिडले व त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून गोंधळ घातला. तसेच दुसऱ्या ट्रॅकवरून जाणाऱ्या ट्रेनला देखील थांबविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने ट्रेन दीनदयाल उपाध्याय जंक्शनला पोहोचली त्यानंतर प्रवाशांना बसने जौनपूरला पाठविणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवासी आणखीन चिडले.

आपली प्रतिक्रिया द्या