असं झालं तर… पासपोर्ट कार्यालयातील अपॉइंटमेंट चुकली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 पासपोर्ट कार्यालयातील अपॉइंटमेंट चुकली असल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही ती पुन्हा शेडय़ुल करू शकता. अपॉइंटमेंट चुकल्यास ती आपोआप रद्द  होते.

2 अपॉइंटमेंट रिशेडय़ुल करण्यासाठी पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइटवर  passportindia.gov.in  वर  लॉगिन करा. ‘View Saved/Submitted Applications’ वर क्लिक करा.

3 ‘Pay and Schedule Appointment’  निवडा. येथे तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट पुन्हा शेडय़ुल करण्याचा पर्याय मिळेल.  वर्षातून फक्त दोनदाच अपॉइंटमेंट रिशेडय़ुल किंवा रद्द करता येते.

4 जर तुम्ही वेळेवर उपस्थित राहिला नाहीत, तर नवीन अपॉइंटमेंटसाठी पुन्हा फी भरावी लागू शकते किंवा टोकन रद्द होऊ शकते.

5 पहिल्या अपॉइंटमेंटच्या तारखेपासून एका वर्षाच्या आत ही सुविधा उपलब्ध असते. अपॉइंटमेंट चुकल्यास, त्याच दिवशी संध्याकाळी 7 नंतर ती रिशेडय़ुल करू शकाल.