संघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

संघर्ष करूनच जीवन उभारणाराच समाजात मानाचं स्थान मिळवतो. काहीजण सहज जगतात, पण काहींना संघर्ष केल्याशिवाय पर्यायच नसतो. अशाच एका संघर्षमय जिद्दीची कहाणी ‘पाटील’ या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. परवा शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

अशाच एका कथेचा नायक शिवाजी… कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधू पाहतोय. स्वप्न पहायला पैसे लागत नाहीत आणि स्वप्न पूर्ण करायला पण पैसे लागत नाहीत लागते ती फक्त मेहनत आणि जिद्द. शिवाजीने हाती घेतलेलं असाध्य ध्येय पूर्ण होतं का? असंख्य अडचणींवर मात करताना त्याला त्याच्या प्रेमाची समंजस साथ लाभते का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या सिनेमातून मिळतील. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे आणि एस.आर.एम एलियन वगैरेंच्या यात भूमिका पाहायला मिळतील.