संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय जनता दल सातत्याने भाजप आणि केंद्र सरकारवर टीका करत आहे. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडिया साईट एक्सवरून भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सतर्क आणि सावध राहा. भाजप तुमचे आरक्षण, देशाची लोकशाही आणि संविधान संपविण्याचे कुटील राजकारण करत आहे, असे आवाहन लालू प्रसाद यादव यांनी गुरुवारी जनतेला केले.
लालू प्रसाद यादव यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, ”देशात संविधान राहिले नाही तर, देशात लोकशाही राहणार नाही. तुम्ही देशाचे समान नागरिकही राहणार नाहीत. घटनात्मक संरक्षण आणि उपाय असावेत. ना हक्क असणारे नागरीक राहाल. मात्र काही लोकांचे तुम्ही गुलाम बनून राहू शकता. संविधान आहे तर, आरक्षण आहे आणि आरक्षण असेल तर असमानता, दडपशाही आणि अत्याचारापासून संरक्षण आहे. समानतेची भावना आहे”.
लालू प्रसाद यादव म्हणाले, भाजपची लक्षणे ही समानते विरोधात आहेत. हे लोक देशाचे संविधान आणि आरक्षण संपवून समाजात असमानता पसरवून मानसिक गुलाम बनवू इच्छित आहेत. हे लोक नवीन संविधान बनवून आरक्षण संपवू पाहात आहेत. कारण आरक्षण आणि संविधान विरोधी वक्तव्यांबाबात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यावर कुठलीही स्पष्टता दिली नाही, ना कारवाई केली.
प्यारे देशवासियों,
सतर्क और सावधान हो जाइए! भाजपा आपका आरक्षण, देश का लोकतंत्र और संविधान खत्म करने पर तुल गया है। देश का संविधान नहीं रहेगा तो देश में लोकतंत्र भी नहीं रहेगा। आप देश के समान रूप से नागरिक भी नहीं रहेंगे। आप ऐसे नागरिक नहीं रहेंगे जिनके पास अधिकार होंगे,…
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) May 16, 2024
‘संविधान, आरक्षण आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत लोकांनी साथ दिली नाही तर, येणारी पिढी पुन्हा त्याच दलदलीत ओढली जाईल. ज्यातून आपली जुनी पिढी गेली. लोकशाहीसाठी या लढतीत सहभागी व्हा आणि संविधान आणि आरक्षणविरोधी भाजपला धडा शिकवा’, असे आवाहन यावेळी लालू प्रसाद यादव यांनी केले.