‘पाटणागढ’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

862

ओडिशातील कॉलेज प्राचार्याच्या घरी पार्सलबॉम्बद्वारे घडवलेल्या बॉम्बस्फोटावर आधारित ‘पाटणागढ’ हा चित्रपट वादाच्या भोवऱयात सापडला आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाने सोमवारी या याचिकेची दखल घेत निर्मात्यांना पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

भैनसा येथील ज्योती विकास ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून सौम्य साहू यांच्या आईची नियुक्ती झाली. त्यानंतर सौम्य यांच्या घरात 23 फेब्रुवारी 2018 रोजी एक पार्सल पाठविण्यात आले. हे पार्सल उघडताच स्फोट झाला. अनेक दिवस उलटूनही या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांना शोध न लागल्याने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. सीआयडीने अधिक तपास केला असता कॉलेजमधील शिक्षक पुंजीलाल मेहेर याने हे पार्सल पाठवल्याचे उघड झाले. सौम्यच्या आईला प्राचार्य केल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. या कथेवर ‘पाटणागढ’ चित्रपट आधारलेला आहे. दरम्यान, या चित्रपटाला अद्याप प्रमाणपत्र दिलेले नाही, असे म्हणणे सोमवारी सेन्सॉर बोर्डाने न्यायालयात मांडले.

या गुन्ह्याशी पतीचा काही संबंध नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना चित्रपट काढणे चुकीचे आहे, असे म्हणणे पुंजीलाल मेहेर यांच्या पत्नी सौदामिनी यांनी मांडले आहे. त्यांच्या वतीने ऍड. विनोद सांगवीकर यांनी याचिका दाखल केली. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या