पाटोदा- बांधकामप्रवण इमारतीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रातिनिधिक फोटो

पाटोदा शहरातील शिवाजी महाराज चौक परिसरातील सध्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये अंदाजे 28 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

मृतदेहाची ओळख पटली
हा मृतदेह एका नेपाळी तरुणाचा असल्याची माहिती मिळत आहे. नेपाळ येथील घनश्याम भीमसेन परिहार हा शहरातीलच एका रेस्टाँरंटमध्ये कुक म्हणून काम करत होता. पण तो गेल्या चार ते पाच दिवसापासून गायब असल्याची माहिती समोर येत आहे.

शनिवारी घनश्याम परिहारचा मृतदेह शिवाजी महाराज चौक परिसरातील एका इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे.

या इमारतीचे बांधकाम सुरु होते. त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या लिफ्टच्या खालच्या टप्प्यात मृतदेह पाण्यात तंरगत असल्याचे तेथील कामगाराने पाहिल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, पोलीस सहाय्यक निरीक्षक धरनीधर कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक पेटर व पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन पंचनाम केला.

आपली प्रतिक्रिया द्या