पावस पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला

2928

रत्नागिरी तालुक्यातील पावस ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र.5 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार सुधीर शिंदे यांनी 49 मतांनी विजय मिळवला. या विजयानंतर विसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

पावस ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 5 मधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी सकाळी तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सुधीर शिंदे यांना 342 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार कृष्णा नैकर यांना 293 मते मिळाली. 49 मतांनी विसेना पुरस्कृत उमेदवार सुधीर शिंदे विजयी झाले. विजयानंतर तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी सुधीर शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख किंरण तोडणकर, माजी उपसभापती सुनिल नावले आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या