अभिनेत्री पायल घोष राजकारणात, आरपीआयमध्ये केला प्रवेश

दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळवणुकीची तक्रार केल्यामुळे चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री पायल घोष हिने राजकारणात एण्ट्री केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायल घोष हिने आरपीआयमध्ये प्रवेश केला.

दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात पायल घोषने पोलीस तक्रार केली होती. मात्र पोलीस चौकशी न झाल्याने तिने आपले म्हणणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे मांडले होते. या प्रकरणात रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला होता. आठवलेंच्या उपस्थितीत पायल घोष, कनिष्का सोनी यांनी सोमवारी रिपाइंमध्ये प्रवेश केला. पायल घोषला रिपाइं महिला मोर्चाचे उपाध्यक्ष बनवले जाऊ शकते अशी चर्चा आहे.

पायल घोषवर अन्याय झाल्याने आपण तिची बाजू घेतली, आंदोलन केले. त्यानंतर याप्रकरणी पुढील हालचाली सुरू झाल्या. तिच्यावर अन्याय करणाऱया व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई व्हायलाच पाहिजेच. यासाठी आम्ही तिच्यासोबत आहोत, असे आठवले म्हणाले. अनुराग कश्यपला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या