
डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेपल कंपनीने हिंदुस्थानात मोठी कर्मचारी कपात केली आहे. कंपनीने तडकाफडकी 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद शहरातील तंत्रज्ञान, इंजिनीअरिंग, ऑपरेशन्स, पेमेंट्स आणि फायनान्स यासारख्या विविध विभागातून करण्यात आली आहे. कर्मचारी कपात करण्याआधी पेपलमध्ये एकूण 6 हजार कर्मचारी कार्यरत होते.





























































