पेटीएम केवायसीच्या बहाण्याने पाच महिन्यात 27 जणांना नऊ लाखांचा गंडा

498

पेटीएम केवायसीच्या बहाण्याने वेगवेगळे रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून पासवर्ड व डेबीट कार्डच्या माहितीची चोरी करून भामट्यांनी नाशिक शहरात पाच महिन्यात 27 जणांना नऊ लाखांचा गंडा घातला आहे. यामुळे नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी अशा रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅपपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

महात्मानगरच्या सारथी सोसायटीतील संगणक विक्रेता प्रकाश दशरथ आहिरे यांना 10 ऑक्टोबर 2019 रोजी पेटीएम केवायसीच्या बहाण्याने अज्ञाताने क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तसे केल्यानंतर आहिरे यांच्या बचत खात्यातून 1 लाख 39 हजार 498 रुपये काढले गेले. अशाचप्रकारे 25 फेब्रुवारीपर्यंत आहिरे यांच्यासह 27 जणांना गुगल प्लेस्टोअरवरून क्विक सपोर्ट, एनी डेस्क, टिमव्ह्यूअरसारखे रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले, तर काहींना मेसेजद्वारे संबंधित अ‍ॅपची लिंक पाठविण्यात आली होती, त्या लिंकवर गेल्यानंतर संबंधित रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड होताच पासवर्ड, डेबीट कार्ड व क्रेडीट कार्ड यांची माहिती चोरून बँक खात्यातून एकूण 27 जणांच्या मोठमोठ्या रकमा भामट्यांनी हडप केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या