राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी पी. सी. चाको

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवरील पदांमध्ये फेरबदल केले असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती केली आहे तर राष्ट्रीय सरचिटणीसपदी राजीव झा यांची नियुक्ती केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवर बदल केले आहेत. पी. सी. चाको 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. सध्या ते केरळ राज्य युनिटचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. चाको हे केरळमधून खासदार म्हणून निवडून आले होते. या दोघांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटना आणि पक्षाची ध्येयधोरणे अधिक बळकट होतील, असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.