पेण तालुक्यातील कोरोनायोद्ध्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

576

संपूर्ण जगासह देशभर पसरलेल्या कोरोनाच्या संकटाविरोधात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून तन-मन-धनाने लढा देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कोरोनायोद्धाचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते  सत्कार करण्यात आला.

यावेळी पेण तालुक्यातील दोन कोरोनायोद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. समाजसेवक व रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचीका व अहिल्या महिला मंडळाच्या अश्विनी गाडगीळ यांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटात मुंबई-गोवा हायवे वरून गावाकडे निघालेल्या शेकडो वाटसरूंना राजू पिचीका यांनी स्वखर्चाने त्यांच्या गावी जाण्याकरिता वाहने उपलब्ध करून दिली.

त्याचप्रमाणे पेण तहसील कार्यालयाला कोरोना रुग्णांची ने-आण करण्याकरिता रुग्णवाहिका दिली आहे. या व्यतिरिक्त कोरोना संकटात शेकडो गोरगरिबांना अन्नधान्य व इतर मदतीचे वाटप केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या सामाजिककार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या