बापरे! सेक्स करताना तुटले लिंग, करावे लागले ऑपरेशन

प्रातिनिधिक फोटो

सेक्स करताना एका तरुणाचे लिंगच तुटले आहे. त्यामुळे या तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि त्याचे ऑपरेशन करावे लागले. इंग्लंडमधील ही विचित्र घटना असून हा प्रकार पाहून डॉक्टरही आवाक झाले होते.

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये याबाबत वृत्त देण्यात आले आहे.  इंग्लडमध्ये एक व्यक्ती आपल्या बायकोसोबत सेक्स करत होता, तेव्हा त्याला अचानक आपल्या लिंगात जोरात दुखु लागले. अखेर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. त्याच्या लिंगाचा एक्सरे काढल्यानंतर डॉक्टरांना धक्काच बसला. तरुणाचे लिंग तुटले असून त्यात तीन इंचाचा चिरा बसल्याचे समोर आले. तरुण आपल्या बायकोसोबत जास्त उत्साहाने प्रणय करत होता. तेव्हा त्याचे लिंग तुटले. जेव्हा त्याचे लिंग तुटले त्याचा आवाज आला नाही कारण मानवी लिंगामध्ये हाड नसते.

अखेर डॉक्टरांनी मोठ्या परिश्रमाने तरुणाच्या लिंगावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेच्या सहा महिन्यांतर तरुण ठीक झाला आहे. सेक्स दरम्यान लिंग तुटण्याची ही विचित्रच नव्हे तर वैद्यकीय इतिहासातील पहिलीच घटना आहे असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या