नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

4537

कोरोनाचे संकट अद्याप टळले नसून करोना आता हात-पाय पसरु लागला आहे. मोठमोठ्या व्हीआयपींकडे असणारे सुरक्षा कवच भेदून तो शिरकाव करू लागला आहे. म्हणून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. केएसएफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 200 बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या ई-उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

महाड येथील एमआयडीसीमध्ये 200 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर कोविड-19 शी एकजुटीने लढा देताना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादनही coviत्यांनी यावेळी केले. देवा ड्रील कंपनीचे अध्यक्ष मोहनकुमार व महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

यावेळी पालकमंत्री  आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, गेले काही  महिने राज्यात दर दिवसागणिक टेस्टींग लॅब, कोविड केअर सेंटर उभे केले व या करोनाच्या साथीला समर्थपणे तोंड दिले. राज्यातील सत्तेत चांगले सहकारी मिळाले म्हणून हे शक्य झाले आहे, म्हणूनच हे श्रेय माझे एकट्याचे नसून जीवापाड मेहनत घेणाऱ्या तुम्हा सर्वांचे आहे.

नागरिकांनी अनावश्यक प्रवास करू नये

करोनाचे संकट अद्याप टळले नसून करोना आता हात-पाय पसरु लागला आहे. मोठमोठ्या व्हीआयपींकडे असणारे सुरक्षा कवच भेदून तो शिरकाव करू लागला आहे. देशाचे गृहमंत्री, अन्य राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री यांना करोनाची लागण झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर येत आहेत, असे सांगून  मुख्यमंत्री ठाकरे यांनी अशा परिस्थितीत आपण गाफील राहता कामा नये, असे आवाहन जनतेला करीत गावपातळीवर करोना दक्षता समिती स्थापन करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच  गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे,  मात्र नागरिकांनी अनावश्यक प्रवास करणे टाळून वाहतूक व रहदारी कमी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेवटी केले.

आपली प्रतिक्रिया द्या