तर खर्च कमी करा, इंधन दर वाढीवर भाजप मंत्र्याचा अजब सल्ला

68

सामना ऑनलाईन । जयपूर

‘पेट्रोल डिझेलचे दर जर वाढले असतील, तर जनतेने काही खर्च कमी करावे’ असा अजब सल्ला राजस्थानचे राज्यमंत्री राजकुमार रिणवा यांनी दिला आहे. रिणवा म्हणाले की “इंधनाच्या किंमती या जागतिक बाजारातून नियंत्रण होतात. त्यामुळे दर वाढीचा आणि सरकारचा काही संबंध नाही. तरी सरकारकडून यासाठी प्रयत्न होत आहेत.” राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पेट्रोल डिझेलवरील वॅटमध्ये ४ टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे इंधन २ ते २.५० रुपयांनी स्वस्त  झाले आहे. तर काँग्रेसने या दरवाढीविरोधात सोमवारी हिंदुस्थान बंद पुकारला होता.

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर रिणवा म्हणाले की “जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतीवर इंधनाचे दर अवलंबून असतात. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भरपूर खर्च असतात. पूर परिस्थिती आहे, अनेक खर्च आहेत. जनतेला कळतच नाही. कच्च्या तेलांच्या किमती वाढल्या आहे तर काही खर्च कमी करावा.”

सचिन पायलट यांची टीका

राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी हा सत्ताधार्‍यांचा अहंकार असल्याची टीका केली आहे. भाजप नेते असंवेदशील झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच  इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त असून असे वक्तव्य करून भाजप नेते त्यांचे दुःख अजून वाढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या