एका तासात ‘या’ व्यक्ती कमवतात अब्जावधी रुपये!

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

सामान्य माणसाला आपल्या हक्काचे, स्वतःचे घर घ्यायचे असेल तर आयुष्यभराची पुंजी लावून, पै-पै जमवत तो ते स्वप्न साकारतो. मात्र, जगात काही असेही लोक आहेत की जे काही तासात अब्जावधी रुपये कमवतात. ते असे नेमके काय करतात आणि कोण आहेत या व्यक्ती याबाबत सगळ्यानांच माहिती हवी असते. तसेच दुसऱ्याचे उत्पन्न जाणून घेण्याची इच्छा सगळ्यानाच असते. एख्याद्या माणसाच्या आयुष्यभराच्या कमाईइतकी रक्कम अमेरिकेतील या व्यक्ती काही तासातच कमवतात.

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अॅपलनंतर एक ट्रलियन डॉलर स्टॉक वॅल्यू असणारी अॅपलनंतरची दुसरी कंपनी ठरली आहे. या कंपनीचे संस्थापक असणारे बेजॉस यांचे एका तासाचे उत्पन्न आहे 44,74,885 डॉलर (सुमारे 32 कोटी रुपये). त्यांच्या तासाभराच्या उत्पन्नावरूनच ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्याचे लक्षात येते. जगातील श्रीमंताच्या यादीत नाव असलेले फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग एका तासाला 1,712,328 डॉलर (सुमारे 12 कोटी रुपये )कमवतात. रिअल इस्टेट क्षेत्रातील अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपनीच्या संस्थापकाची मुलगी एलिस वॉल्टन ही जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे. वॉल्टन या प्रत्येक तासाला 13,92,694 डॉलर (10 कोटी रुपये) कमवतात.

गुगलचे सहसंस्थापक असलेले लॅरी पेज यांचे नावही जगातील श्रीमंताच्या यादीत आहे. प्रत्येक तासाला त्यांची संपत्ती 9,24,657 डॉलरने (6.61 कोटी रुपये) वाढते. इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी असणाऱ्या टेस्लाचे विशेष कार्यकारी अधिकारी एलन मस्क प्रत्येक तासाला 6,84,391डॉलर (4.89 कोटी रुपये) कमवतात. काइली कॉस्मेटीकच्या संस्थापक आणि इंस्टाग्रामवर रिच लिस्टमध्ये अव्वल असणाऱ्या काइली जेनर प्रत्येक तासाला 19,006 (13 लाख रुपये) कमवतात. अमेरिकेतील प्रसिद्ध गायक बियॉन्से यांनी कमाईत अनेकांना मागे टाकले आहे. ते आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी एका तासाचे 6,849 डॉलर (5 लाख रुपये) मानधन घेतात.