प्लास्टिक वापरणार्‍याचे हात पाय तुटू दे, भाजप आमदाराचे देवाला विचित्र साकडे

422

सगळ्यांचे भलं कर असे सगळेजण देवाकडे प्रार्थना करतात. परंतु प्लास्टिक वापरणार्‍याचे हात पाय तुटू दे अशी अजब प्रार्थना भाजप आमदाराने केली आहे. मदन दिलावर असे या आमदार महोदयांचे नाव असून ते राजस्थानमधील रामगंजमंडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात

दसर्‍यानिमित्त गावात दुर्गा पुजा आयोजित करण्यात आली होते. आमदार महोदय तिथे पोहोचले. दुर्गा मातेजवळ प्रार्थना करताना दिलावर म्हणाले की “दुर्गा माता सर्वांना सुख समृद्धी. सगळ्यांचे भले कर. परंतु जे लोक प्लास्टिक वापरतात, जे लोक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सामान आणतात, जे लोक प्लास्टिकच्या कपात चहा घेतात, जे घाण पसरवतात त्यांना आजारी पाड. त्यांच्या घरातील कुणाच हात तोड, पाय तोड. कुणाचेही नुकसा होईल असे काही तरी करा” त्यांच्या घरी कधीच संपत्ती आली नाही पाहिजे असेही आमदारांनी प्रार्थनेत म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या