
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या फेसबुकवर वैयक्तिक माहिती आणि गोपनीयतेची पोस्ट मोठय़ा प्रमाणात शेअर होतेय. युजर्स फेसबुकला त्यांचे फोटो आणि वैयक्तिक माहिती वापरण्यास परवानगी नसल्याचे सांगत आहेत व इतरांनाही हा संदेश कॉपीपेस्ट करायला सांगत आहेत. या व्हायरल पोस्टमध्ये असा दावा आहे की, जर तुम्ही असे केले नाही तर फेसबुकला तुमची माहिती वापरण्याचा कायदेशीर अधिकार मिळेल, पण यामध्ये किती तथ्य आहे? हे जाणून घेऊ यात. अशा पोस्ट 2024 आणि 2025 च्या सुरुवातीलादेखील व्हायरल झाल्या. फरक एवढाच की, या वेळी तो हिंदी, मराठीसह सर्व स्थानिक भाषांमध्ये देशभर पसरत आहे. फेसबुक किंवा मेटाने असा कोणताही नियम जाहीर केलेला नाहीये. ज्यामुळे तुमच्या माहितीचा वापर होईल ही पोस्ट पूर्णपणे अफवा असल्याचे समजतेय.