कोस्टल रोडविरोधात हायकोर्टात याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

स्थानिक मच्छीमारांचे मत विचारात न घेताच राज्य सरकार व पालिकेमार्फत कोस्टल रोड बांधण्यात येत असल्याने या कोस्टल रोडला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर राज्य सरकार तसेच महापालिकेच्या वतीने 29.2 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. कोस्टल रोडच्या या कामाला युद्धपातळीवर सुरुवातही करण्यात आली आहे.  या कोस्टल रोडमुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होणार असून पालिका तसेच राज्य सरकारने पर्यावरणविषयक परवानग्या घेतल्या नाहीत, असा आरोप मच्छीमारांनी याचिकेद्वारे केला आहे.