पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बंदला जिल्हाभरात प्रतिसाद

सामना प्रतिनिधी । हिंगोली

पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आघाडीसह समविचारी पक्षांनी पुकारलेल्या बंदला जिल्हाभरात प्रतिसाद मिळाला. औंढा, वसमत, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापुर, जवळा बाजार येथे निदर्शने करण्यात आली.

केंद्र आणी राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे इंधन दरवाढीने उच्चांक गाठला असुन, सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असतांना शासन कमालीचे उदासीन धोरण बाळगत असल्याने महागाईच्या निषेधार्थ आघाडीसह समविचारी पक्षाने आज बंदची हाक दिली होती. शहरात आ. रामराव वडकुते, आ.टारफे, राकाँ जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, रिपाई गवई गटाचे प्रदेश सरचिटणीस मधुकर मांजरमकर, मनसे जिल्हाध्यक्ष बंडु कुटे, काँग्रेस नपाचे गटनेते नेहाल भैय्या, सुरेशअप्पा सराफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हातगाड्यावर दुचाकी ठेऊन हातगाडा ओढत नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राकाँ शहराध्यक्ष जावेद राज, विलास गोरे, शामराव जगताप, विशाल गोटरे, भागोराव राठोड, नारायण खेडकर, एन.एफ.बांगर, बी.डी.बांगर, विनोद नाईक, अशोक टापरे, मनिष आखरे, मुजीब कुरेशी, स.बासीत, नगरसेवक माबुद बागवान, आरेफ लाला, शेख हबीब आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.