आजच करा टाकी फुल, उद्यापासून पेट्रोल-डिझेलचे भाव करणार बत्ती गुल

2033
petrol-dispencer

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या 1 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत. व्हॅट वाढवल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक ते दोन रुपये वाढ होईल. यामुळे आधीच कोरोनामुळे खिशात पैसे नसलेल्या नागरिकांना अधिकचा भार सोसावा लागणार आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे वस्तूंच्या किंमतीही वाढतील.

उत्तर प्रदेश, दिल्ली आणि झारखंड या राज्यांनी यापूर्वीच व्हॅट वाढवला आहे. तर आता मिझोराम, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनीही व्हॅट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज सकाळी 6 वाजता बदतात, मात्र गेल्या तीन दिवसात यात वाढ किंवा घट झालेली नाही.

मिझोराम सरकारने पेट्रोलवर 5 टक्के आणि डिझेलवर 2.5 टक्के व्हॅट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-कश्मीरमध्येही व्हॅट वाढल्याने पेट्रोल 2 रूपये आणि डिझेल 1 रुपये महाग होईल. हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 1 रुपया प्रति लिटर महाग होईल. यामुळे राज्याच्या तिजोरीत अतिरिक्त पैसा जमा होईल.

मुख्य शहरातील आजचे भाव –
दिल्ली – पेट्रोल 71.26 रुपये प्रति लिटर, डिझेल 69.30 रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल 73.30 रुपये प्रति लिटर, डिझेल 65.62 रुपये प्रति लिटर
चेन्नई – 75.54 रुपये प्रति लिटर, डिझेल 68.22 रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल 76.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 66.21 रुपये प्रति लिटर

 

आपली प्रतिक्रिया द्या